11

'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे' | Maayboli

http://www.maayboli.com

शेतक-यांच्या आत्महत्यांच्या समस्येवर सद्ध्या बरीच चर्चा आणि उहापोह सुरु आहे. या समस्येची उकल करतांना अनेक मान्यवरांनी शोधलेली कारणे आणि सुचविलेले उपाय बघितले तर "शेतकरी मरतोय तर मरू द्या पण त्याच्या आत्महत्येची कारण-मीमांसा करणे आणि उपाय सुचविणे बंद करा" अशा स्वरुपाची आत्मक्लेशी प्रतिक्रिया शेतकरी समाजमनात उमटल्याशिवाय राहत नाही.

संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »
प्रेषक चंपक 7 वर्ष 33 आठवडे ago – बहुचर्चित झाली 7 वर्ष 32 आठवडे अगोदर
Category: गद्य लेखन   Tags:

भुमीपुत्रच भूमीहीन झालाय...

skyprince75 7 वर्ष 32 आठवडे १ दिवस 8 तास ago

भुमीपुत्रच भूमीहीन झालाय...

भुमीपुत्रच भूमीहीन झालाय,
दाही दिशांना वणवण फिरतोय.
लोकांचे पोट भरणाराच आज मात्र
उपासमारीने मरतोय.

शेतक-याचा पोर उपाशी
शेतक-याच्या देशामध्ये.
कुपोषणाच्या वेषात
बालमृत्यू थैमान घालतोय.
लोकांचे पोट भरणाराच आज मात्र
उपासमारीने मरतोय.

बँकांकडून कर्ज घेतले
दुष्काळाने लादली नादारी.
घाव हा दुहेरी प्रवृत्त
आत्महत्येला करतोय.
लोकांचे पोट भरणाराच आज मात्र
उपासमारीने मरतोय.

सरकारी अनुदाने होत आहेत
मंत्र्यांच्या तिजोरीत बंद.
कर्जवसुलीसाठी शेतक-यांच्या
घरादारावर नांगर फिरतोय.
लोकांचे पोट भरणाराच आज मात्र
उपासमारीने मरतोय.

श्रीमंतांच्या, हिरोन्च्या भल्यासाठी
नवस सायास केले जातात.
गरीब शेतक-याला आपण
पद्धतशीर विसरतोय.
लोकांचे पोट भरणाराच आज मात्र
उपासमारीने मरतोय.

भुमीपुत्रच भूमीहीन झालाय..

अभय आर्वीकर 7 वर्ष 32 आठवडे 15 तास 25 मिनिटे ago

आकाशीच्या राजकुमारा,
फारच छान लिहिलयं..
लिहित राहा...

नागपूरचे अनन्द सोवनी या

susmita 7 वर्ष 30 आठवडे 5 दिवस 23 तास ago

नागपूरचे अनन्द सोवनी या क्षेत्रात बर>च काम करत आहेत.
यवतमाळला श्री वडनेरकर या आत्मह्त्याग्रस्त शेतकर्यांच्या मुला>सठी शाळा चालवतात.

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use