1

"लर्न मराठी फ्रॉम इंग्लीश, हिन्दी ! ऑनलाईन अ‍ॅंड फ्री !!"

http://kaushiklele-learnmarathi.blogspot.com

नमस्कार. मी कौशिक लेले,
मी २ वेबसाईट (ब्लॉग) तयार केल्या आहेत - एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी आणि दुसरा हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी.
http://kaushiklele-learnmarathi.blogspot.in/ (१२० धडे)
http://learn-marathi-from-hindi-kaushiklele.blogspot.in/ ( ९३ धडे)

संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »

अधिक माहिती

कौशिक लेले 3 वर्ष 35 आठवडे 4 दिवस 17 तास ago

या ब्लॉग मध्ये देवनागरी लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात मराठी शिकू इच्छिणाऱ्यांसाठी 'one-stop-shop' असा हा ब्लॉग आहे.
Learn Marathi from English मध्ये ११८ धडे आहेत.
Learn Marathi from Hindi मध्ये ९१ धडे आहेत.
मी या ब्लॉग मधील संभाषणाच्या १५ ० च्या आसपास साउन्ड क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना मराठी उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
YouTube Channel Kaushik Lele

मी स्वतः माझा छंद म्हणून तमिळ आणि गुजराती पुस्तकावरून शिकलो. त्यावेळी इतरांना मराठी शिकण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहेत हे तपासायचा मी प्रयत्न केला. काही पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत पण मला ती समाधानकारक वाटली नाहीत. इंटरनेट वर मराठी शिकण्यासाठीचे पर्याय फारच तुटपुंजे आणि अर्धवट सोडलेले दिसले. त्या तुलनेत परकीय भाषा शिकण्यासाठी खूपच पर्याय उपलब्ध आहेत. या वस्तुस्थितीमुळे मी अस्वस्थ झालो. मराठी भाषेचा आग्रह आपण धरतो, अमराठी लोकांनी मराठी शिकलंच पाहिजे असं आपण म्हणतो पण मराठी शिकण्यासाठीचे पुरेसे पर्याय आपण तयार केलेले नाहीत हे मला जाणवलं.

इंटरनेटच्या जमान्यात प्रत्येक गोष्ट नेट वरच शोधली जाते. त्यामुळे नेटवरच अशा प्रकारचे साहित्य असले पाहिजे आणि तेही मोफत असावे असे मला वाटले. मला स्वतःला भाषा शिकणे-शिकवणे आवडते आणि मी सॉफ्टवेअर इंजिनीअर असल्याने स्वतः हे काम करायचं ठरवलं. मी ज्या पद्धतीने तमिळ आणि गुजराती शिकलो त्या पद्धतीने इतरांना मराठी शिकवायचं ठरवलं.
त्याप्रमाणे मागच्या वर्षी Learn Marathi from English ब्लॉग ची सुरुवात झाली. एका महिन्यातच ३० च्या वर लेसन्स लिहिले. फेसबुकवर याबद्दल लोकांना कळवले. अपेक्षेप्रमाणे चांगला प्रतिसाद मिळाला. काही जणांनी मेल पाठवून ब्लॉग उपयुक्त वाटतोय हे सांगितल्यावर हुरूप आणखी वाढला. आणि गेल्या दीड वर्षात खूपच प्रगती झाली.

Learn Marathi from English/hindi ब्लॉग वापरून काही भारतीय तर काही परदेशीय व्यक्तीही मराठी शिकत आहेत.

परंतु या उपक्रमाची माहिती अजून मोठया प्रमाणावर मराठी शिकू इच्छिणार्यंपर्यंत पोचणे गरजेचे आहे. अधिकाधिक मराठी व्यक्तींना या बाबत समजले तर ते इतर अमराठी आणि मराठी शिकू इच्छिणाऱ्यांना हा ब्लॉग वाचण्याबद्दल सांगू शकतात.

तरी माझा अल्पसा प्रयत्न आपल्यासमोर मी मांडला. आपण दोन्ही ब्लॉगना भेट देऊन आपल्या प्रतिक्रिया/सूचना कळवाव्यात ही नम्र विनंती.

धन्यवाद.
कौशिक लेले

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use